Bailahongala

तिगडी गावातील महिलेचे प्रकरण खोटे , ग्रामस्थ आणि ग्राम पंचायतीने फेटाळला आरोप

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात काल महिलेला अर्धनग्न करून , मारहाण केल्याचा आरोप खोटा असल्याचे , ग्रामस्थ आणि पंचायत सदस्यांनी सांगितले आहे .

बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात, जमिनीच्या मुद्द्यावर अर्धनग्न करून महिलेला मारहाण केल्याची तक्रार, महिला विभागाच्या आदेशावरून , पोलीस विभागाने नोंदवून घेऊन गुन्हा नोंद केला आहे . मात्र महिलेने केलेला आरोप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी फेटाळून लावला आहे .

हे प्रकरण निव्वळ खोटे असल्याचे ग्रामस्थांनी माध्यमांना सांगितले होते. 20 वर्षांपूर्वी विकल्या गेलेल्या याच जमिनीवर बांधलेल्या घरांना रस्ता, पाणी, वीज अशा विविध सेवा देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिल्याने तिने इतर खोटे आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. गावात असे कृत्य झालेले नाही. तिगडी गाव हे महिलांची पूजा करणारे गाव आहे.

हा आरोप करणाऱ्या महिलेने केलेले सर्व आरोप निव्वळ खोटे असून पैशाच्या हव्यासापोटी तिने हा आरोप केला आहे. गावात कोणाला विचारले तरी येथील लोक या प्रकरणाची स्पष्ट माहिती देण्यास तयार आहेत. स्थानिक व ग्रामपंचायतीने महिलेवर आरोप केला आहे की, तिची जमीन खरेदी करून, त्या जमिनीवर बांधलेल्या मालकाला धमकावून दमदाटी केली आणि तुझ्यावर गुन्हा दाखल करू, असे सांगून आणखी पैसे उकळण्यासाठीब्लॅकमेल केले.

Tags: