धारवाड शहरात दोन अतिरिक्त पोलीस ठाणी उभारण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
धारवाडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. धारवाड शहरात दोन अतिरिक्त पोलिस ठाणी निर्माण करण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन दिले.
शहराची लोकसंख्या तसेच गुन्हेगारी वाढल्यामुळे सध्याच्या पोलिस ठाण्यावर अधिक जबाबदारी येऊन पडली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक कायदा व सुव्यवस्था पोलीस ठाणे व एक वाहतूक पोलीस ठाणे सुरू करावे.
शहरातील जातीय दंगलीचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आणि समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्याचा आणखी दोन पोलिस ठाण्यांची नितांत गरज आहे. राज्य सरकार व गृहखात्याने याची दखल घेऊन पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा तीव्र संघर्ष सुरू करू, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments