ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांचा सन्मान करणे हा त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी चिक्कोडी विधानसभा मतदारसंघासाठी अण्णासाहेब जोल्ले खासदार करंडक पुरुष व महिला कब्बडी स्पर्धा ७ ते ८ जानेवारी रोजी एकसंबा शहरातील शिवशंकर जोल्ले कन्नड शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार असल्याचे . मॅग्नम टफ कंपनीचे संचालक बसवप्रसाद जोल्ले म्हणाले.

चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी चिक्कोडी लोकसभेच्या अखत्यारीतील 8 विधानसभा मतदारसंघात या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले असून, प्रत्येक मतदारसंघातून 15 हून अधिक महिला संघ आणि 65 हून अधिक पुरुष संघांनी सहभाग घेऊन ती यशस्वी करतील .
त्याचप्रमाणे चिक्कोडी विधान सभा मतदार क्षेत्रातून आणखी संघ सहभागी होण्याची अपेक्षा आहे.पहिले बक्षीस रुपये 21,000, दुसरे बक्षीस 15,000 रुपये, तिसरे आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 7,500 रुपये असेल, असे ते म्हणाले.
यावेळी आशाज्योती मतिमंद बाल विद्यालयाचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले, जयानंद जाधव, आप्पासाहेब जोल्ले, कल्लाप्पा जाधव, संजीव पाटील, विकास पाटील, मनोज किचडे, अन्वर दाडीवाले, लक्ष्मण कबाडे, आनंद पाटील, अभिनंदन पाटील, सिद्रादादा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments