Belagavi

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कॅम्प येथे विविध नमुन्यातील ओल्डमॅन उपलब्ध

Share

सरत्या वर्षाला निरोप नेऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण बेळगाव शहर सज्ज झाले आहे . ह्या वर्षातील जुन्या वाईट आठवणी , वाईट अनुभव ओल्ड मॅन च्य स्वरूपात जाळून टाकून नव्या वर्षात पुन्हा उमेदीने चांगली सुरुवात करण्याची प्रथा बेळगावात पाळली जाते . कॅम्प परिसरात असे विविध स्वरूपातील ओल्डमॅन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत .


बेळगावमध्ये सरत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री बारा वाजता ओल्डमॅन जाळून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते . त्यासाठी बेळगावमधील कॅम्प भागात राहणारे कांबळे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारातील ओल्डमॅन बनवून त्याची विक्री करतात . ग्राहकनाच्या मागणीनुसार ते ओल्डमॅन तयार करून देतात . यंदाही त्यांनी असेच अनेक ओल्डमॅन तयार केले आहेत .

या ओल्डमॅन बनवण्याच्या कामात मदत करण्यासाठी इचलकरंजी येथून आलेल्या नेताजी पाटील यांनी सांगितले कि, आमच्या आजोबांच्या काळापासून ओल्डमॅन तयार केले जात आहेत . मागील १५ दिवसांपासून हे ओल्डमॅन तयार करण्याचे काम सुरु आहे .

तर खानापूर रोड , कॅम्प येथील मोरे नामक तरुणाने सांगितले कि , दरवर्षी ओल्डमन वेगवेगळ्या स्वरूपात तयार करतो . ४० वर्षांपासून इथे ओल्डमॅन बनवले जातात . यंदाही वेगवेगळ्या स्वरूपातील ओल्डमॅन तयार केले आहेत . अगदी ४ फुटपासून ते १५ ते २० फुटांपर्यंत आम्ही ते बनवतो . ४ फुटी ओल्डमॅनची किंमत एक हजार रुपये, पाच फुटी ओल्डमॅनची किंमत २५०० रुपये , ७ फुटी ओल्डमॅनची किंमत तीन हजार रुपये आणि १५ फुटी ओल्डमॅनची किंमत सात हजार रुपये इतकी आहे . . हे ओल्डमॅन बनवण्यासाठी आम्ही , खळ , रद्दी , कार्डबोर्ड, लाकडे आदींचा आम्ही वापर करतो .

 

Tags: