Belagavi

बेळगावमध्ये कर्नाटक रक्षण वेदिकेचे जोरदार आंदोलन

Share

कर्नाटक रक्षण वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष टी.ए. नारायण गौडा यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी करवे कार्यकर्त्यांनी आज बेळगाव शहरातील चन्नमा सर्कलमध्ये जोरदार निदर्शने करून, टी ए नारायण गौडा आणि अन्य कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करून , राज्य सरकारसहित , पोलीस विभागावर आपला रोष व्यक्त केला .

कर्नाटक राज्यात कन्नड ही सार्वभौम भाषा आहे . कर्नाटकात सर्व ठिकाणी , व्यापारी आस्थापने तसेच दुकाने यावरील नामफलकात ६० % कन्नड भाषेचा वापर केला जावा असा सरकारचा आदेश आहे . या आदेशाची अंमलबजावणी सक्तीने करण्यासाठी टी ए नारायण गौडा तसेच कार्यकर्त्यांनी बेनागळूरमध्ये आंदोलन केले . याप्रकरणी कायदा हातात घेतल्याने , त्यांना अटक करून कारवाई करण्यात आली . याचे पडसाद आज बेळगावमध्ये पाहायला
मिळाले .
शासन व पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत बेळगाव करवे जिल्हा संघटनेकडून , बेळगावच्या चन्नमा सर्कलमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली . यावेळी पोलीस आणि राज्य सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करून , करवे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले . यावेळी कार्यकर्त्यांनी बसेस रोखून धरल्या . या आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

करवेचे प्रदेशाध्यक्ष टी ए नारायण गौडा आणि कन्नड कार्यकर्त्यांना बेंगळुरूमध्ये नामफलकांवर कन्नड वापरणे अनिवार्य करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केल्याने त्यांना अटक करण्यात आली हे अत्यंत निषेधार्ह आहे. जमीन, पाणी यांच्या रक्षणासाठी लढणाऱ्यांना दडपले जात आहे. अटकेत असलेल्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी महादेव तळवार यांनी केली . कर्नाटक राज्यात नामफलकात ६० % कन्नड असावे . आम्ही अगदी ग्रामीण स्तरावर देखील हे आंदोलन करणार आहोत . यासाठी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला .

तर करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी देखील सरकार आणि पोलीस यांच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला . राज्य सरकारने , पोलिसांकरवी नारायण गौडा यांचे आंदोलन दडपून त्यांना अटक केली . याचा निषेध करून आम्ही आज बेळगाव जिल्हा स्तरावर आंदोलन करीत आहोत .नारायण गौडा यांची त्वरित सुटका करावी अन्यथा राज्य स्तरावर आम्ही उग्र आंदोलन करू . शहरात इंग्रजी व मराठी भाषेत ;लावलेले नामफलक हटवावेत . अन्यथा तीव्र संघर्ष करणे अपरिहार्य असल्याचा इशारा त्यांनी दिला .

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या या आंदोलनामुळे , चन्नमा सर्कलमध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती . पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला . मात्र आंदोलक आपल्या जागी ठाम होते. करवेच्या या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभागाची दमछाक झाली . या आंदोलनामुळे मात्र वाहनधारकांसह नागरिकांना वेठीस धरल्यासारखे झाले .

Tags:

kannada KRV NARAYAN GOUDA PROTEST