Belagavi

श्री नवदुर्गा अय्यप्पा स्वामी मंदिरात 27 वी वार्षिक अय्यप्पा स्वामी पूजा

Share

बेळगावातील रुक्मिणी नगरातील श्री नवदुर्गा अय्यप्पा स्वामी मंदिरात 27 वी वार्षिक अय्यप्पा स्वामी पूजा तसेच महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता .

बेळगावातील कणबर्गी रोडवरील , रुक्मिणी नगरातील , श्री नवदुर्गा अय्यप्पा स्वामी मंदिरात , सुरेंद्र गुरुस्वामी यांच्या नेतृत्वाखाली , मंदिराचा 27 वी वार्षिक अय्यप्पा स्वामींची पूजा करण्यात आली . यावेळी मंदिरात अभिषेक , सहस्त्र नामार्चन, भजन , मंगलारती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . बेळगाव शहर परिसरातील अय्यप्पा स्वामी भक्तांनी याचा लाभ घेतला .
यावेळी , कमिटीचे अध्यक्ष आर एन शेट्टी यांनी या धार्मिक कार्यक्रमाविषयी माहिती देताना सांगितले कि , या मंदिरात पूजा केल्यानंतर जिल्हाभरातून जवळपास डॉ हजार मालाधारी शबरी मलयला जातात . आज अय्यप्पा स्वामींची महापूजा तसेच महाप्रसाद आयोजित केला आहे . दर शनिवारी इथे प्रसाद वितरित केला जातो . पुढील वर्षी आम्ही अय्यप्पा स्वामींची जत्रा करण्याचे नियोजन करीत आहोत असे सांगतले .

यावेळी गुरुस्वामीनी समस्त बेळगावच्या जनतेवर श्री अय्यप्पा स्वामींची कृपा राहावी अशी प्रार्थना केली . ( )
या कार्यक्रमाला रुक्मिणी नगर , कणबर्गी परिवारासहित बेळगाव मधील श्री अय्यप्पा स्वामी भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला

Tags: