Banglore

अल्पसंख्याक वसाहतींना हजार कोटी, मग हिंदू-दलितांनी काय घोडे मारले? : अशोक

Share

आपल्या राज्यातील विकासासाठी 5000 कोटी, त्यातही अल्पसंख्याक वसाहतींच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे. मग हिंदू आणि दलितांनी काय घोडे मारले आहे? लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण राबवत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली.

बेंगळुरमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांचावर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्यात दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहेत. 500 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना सरकारने भरपाई दिलेली नाही. एवढे सगळे होऊनही सिद्धरामय्या अल्पसंख्यांकांना बंपरवर बंपर बक्षिसे देत आहेत. आपल्या राज्यातील विकासासाठी 5 हजार कोटीची तरतूद केली. पण त्यातही अल्पसंख्याक वसाहतींच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मग हिंदू आणि दलितांनी काय घोडे मारले आहे? लोकसभेच्या निवडणुकीसाठी ते लॉबिंग करत आहेत. त्यांच्यात टिपू संस्कृती लादण्याचे काम सिद्धरामय्या करत आहेत, एका शेतकऱ्याला 35 हजार द्यावेत.

त्यांनी बेळगाव अधिवेशनात दोन हजार कोटींची घोषणा केल्या. आठवडाभरात दोन हजार देईन, म्हटले होते. अधिवेशन संपूनही एवढा वेळ झाला असून अद्यापही ते दिलेले नाही. मात्र त्यांनी अल्पसंख्याकांना १ हजार कोटी देऊन त्यांचे तुष्टीकरण केले आहे. टिपूने पूर्वी हिंदू आणि मुस्लिमांना ज्या प्रकारे वेगळे केले होते, तेच आताही झाले आहे. हिंदू वसाहती-मुस्लिम वसाहती असा भेद केला आहे. सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली तेव्हा सर्व धर्मांना समानतेने पाहण्याचे वचन दिले होते. परंतु आता ते हे विसरले आहेत, अशी टीका अशोक यांनी सिद्दरामय्या यांच्यावर केली.

सरकारने विकासाचा एकही दगड रचला नसल्याचे काँग्रेसचेच बी. आर. पाटील सांगत आहेत. अशाप्रकारे ते लुबाडणूकीचे राजकारण करत आहेत. जिथे हिंदू राहतात त्या वसाहतींत विकास का नको? पीएफआयवरील खटले मागे घेतले. आता म्हैसूरचे आमदार केजी हळ्ळी, डीजे हळ्ळी प्रकरण मागे घेण्यासाठी पत्र लिहून शिफारस करतात. ज्यांनी कुकर बॉम्ब फोडला ते आमचे भाऊ आहेत, असे डीसीएम डीके शिवकुमार म्हणतात अशी टीका आर. अशोक यांनी केली.

शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांच्यावरील चेक बाऊन्स प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आर. अशोक म्हणाले की, शिक्षण विभागाच्या मंत्र्यांनी असे केले तर कसे? न्यायालयाच्या आदेशानंतरही मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. काँग्रेस सरकार लुटण्यासाठी एका पायावर तयार आहे. चेक बाऊन्स झाला म्हणजे फसवणूक झाली. त्यामुळे मधु बंगारप्पा यांनी तत्काळ राजीनामा द्यावी, अशी मागणी आर. अशोक यांनी केली.

Tags: