National

फक्त मुलीच नाही तर मुलंही स्किन केअरबाबत करतात ‘या’ चुका; वेळीच त्यांना टाळा

Share

स्किन केअरच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं तेव्हा सर्वात आधी मुलींचा विचार येतो. तर, याऊलट मुलांना कोणत्याच स्किन केअरची गरज नाही असं वाटतं. तुम्हीही असा विचार करत असाल तर हा तुमचा गैरसमज आहे. वाढतं प्रदूषण आणि बिघडलेली जीवनशैली या कारणांमुळे मुलांच्या सुद्धा चेहऱ्यावर परिणाम होतो. आणि तुमच्या त्वचेचं हे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही स्किन केअर रूटीन फॉलो करणं गरजेचं आहे.

खरंतर, दिवसभर प्रदूषणाचा सामना केल्यानंतरही फार कमी मुलं अशी आहेत जे आपल्या त्वचेची काळजी घेतात. पण, जी मुलं त्वचेची काळजी घेतात तीसुद्धा ते योग्य पद्धतीने घेत नाहीत. याचं कारण म्हणजे ते संपूर्ण प्रक्रिया फॉलो करत नाहीत.यामुळे तुमची त्वचा ग्लो करत नाही. अशा वेळी स्किन केअरच्या या चुकांमुळे तुमची त्वचा लवकर खराब होते.

सनस्क्रिनचा वापर न करणे आजकाल क्वचितच अशी मुलगी असेल जी सनस्क्रिनचा वापर करत नसेल. याऊलट फार कमी मुलं अशी आहेत जी सनस्क्रिनचा वापरच करत नाहीत. सनस्क्रिनचा वापर न केल्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. यामुळे सर्नबर्न सारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी सर्वांनी सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे.

त्वचेला मॉईश्चराईझ न करणे फेसवॉश केल्यानंतर तुमच्या त्वचेला मॉईश्चराईझ करणं खूप आवश्यक आहे. त्वचेला मॉईश्चरायझर न लावल्याने तुमची त्वचा कोरडी पडते. तसेच, कोरड्या त्वचेमुळे आपला आत्मविश्वासही कमी होतो. तुम्हाला जर तुमची त्वचा सॉफ्ट हवी असेल तर त्वचेवर रोज सकाळी फेसवॉश केल्यानंतर मॉईश्चरायझर करणं गरजेचं आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या मॉईश्चरायझर विकत घेताना तुमच्या स्किनटोन नुसार त्याची निवड करा.

पिंपल्स कधीच फोडू नका पिंपल्सचा त्रास हा फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही असतो. काही मुलं पिंपल्स आल्यानंतर त्यांना फोडतात. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. तुमची त्वचा खराब होण्यामागे हे एक मुख्य कारण आहे.

घाईत शेव्ह करणे मुलांनी शेव्ह करताना कधीही घाई करू नये. असं केल्याने तुमची त्वचा लाल होऊन खाज सुटु शकते.

योग्य प्रोडक्ट निवडा कोणतीही क्रिम किंवा फेसवॉश चेहऱ्यावर लावण्याआधी त्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी एकदा नीट चेक करा. जास्त केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करू नका. तसेच, तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स सूट होत नसतील तर तुम्ही घरच्या घरी फेसमास्क तयार करू शकता.

Tags: