मुतगा गावातील कुमारी आराध्या पाटील या श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलीला महिला व बालकल्याण विभागाच्या उपकरण योजनेअंतर्गत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते आज श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
मुतगा गावातील कुमारी आराध्या पाटील ही श्रवणशक्ती कमी झालेली मुलगी. तिला आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते महिला व बालकल्याण विभागाच्या उपकरण योजनेंतर्गत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
श्रवणयंत्र घातल्यानंतर स्पष्ट ऐकू येऊ लागल्याने आराध्याच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलले. या क्षणाचा मंत्री हेब्बाळकर साक्षीदार झाल्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे प्रभारी उपसंचालक, जिल्हा अपंग कल्याण अधिकारी व डीडीआरसी कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments