बस नियोजित वेळेवर न आल्याने धारवाड तालुक्यातील उप्पीन बेटगेरी गावात कणगला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अचानक बसेस अडवून आंदोलन केल्याची घटना घडली.

याआधी उप्पीन बेटगिरी गावात तीन-चार बसेस सतत धावत होत्या. मात्र, आता सकाळी ८ वाजताची बस धारवाडसाठी सुटली तर सकाळी १० वाजेपर्यंत बससेवा नाही. त्यामुळे नियोजित वेळेत महाविद्यालयात जाता येत नसल्याने आज अचानक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी बस रोखून आंदोलन केले.
सकाळी 9 आणि 10 वाजता दोन बसेस लागतात. या दोन बस आल्यास विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात जाणे सोयीचे होणार आहे. अनेकवेळा आगार व्यवस्थापकांना विनंती करूनही उपयोग झाला नसल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत नियंत्रकाशी चर्चा केली. आगार व्यवस्थापकाने जागेवर येऊन बस सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे. तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले .


Recent Comments