बैलहोंगल येथील चर्मकार समाजावर जिल्हा प्रशासन 42 वर्षांपासून अन्याय करत असून, हक्कपत्रे देण्यात यावी, अन्यथा बैलहोंगल बंद पुकारू, असा इशारा माजी आमदार विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे.

बैलहोंगल येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या 24 दिवसांपासून सत्याग्रह करत असलेल्या चर्मकार समाजबांधवांची सत्याग्रह स्थळावर माजी आमदार विश्वनाथ पाटील यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्हा प्रशासन 42 वर्षांपासून समगर समाजावर अन्याय करत आहे.
पिडीतांना न्याय देणे आणि जनतेचे प्रश्न सोडवणे हे आमदारांचे कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांनी यापूर्वीच येऊन पाहणी केली आहे. पण हक्कपत्र देण्याची कार्यवाही झालेली नाही. त्वरित हक्कपत्रे न दिल्यास बैलहोंगल बंद पुकारावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments