कोणीही शांततेने आंदोलन करावे. धरणे आंदोलन केल्याप्रकरणी करवे कार्यकर्त्यांवर कारवाई झालेली नाही. कायदा हातात घेतल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.
कन्नड नामफलक बसवण्यासाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या निदर्शनासंबंधी बेंगळूर येथील केपीसीसी कार्यालयात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, जो किणी कायदा हातात घेईल त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणीही शांततेने आंदोलन करावे.
धरणे आंदोलन केले म्हणून करवे कार्यकर्त्यांवर कारवाई झालेली नाही. त्यांनी कायदा हातात घेतल्याबद्दल पोलिसांनी कारवाई केली आहे, कन्नड नामफलक लावणे सक्तीचे करण्याचा नियम बनवण्याचा सरकारचा विचार आहे. कन्नड भूमीत फक्त कन्नड नामफलक असावेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.


Recent Comments