Belagavi

बेळगावात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

Share

ऑनलाईन डिजिटल मार्केटमध्ये ग्राहकाला दिशाभूल करणारे निर्देश दिले जातात. त्यामुळे डिजिटल प्रणालीमध्ये वस्तू खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी यांनी केले.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कायदा सेवा प्राधिकरण आणि विविध खात्यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज कन्नड साहित्य भवनात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी यांनी ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यवसायातील फसवणुकीबद्दल माहिती दिली. ऑनलाईन डिजिटल मार्केटमध्ये दिशाभूल करणारे निर्देश दिले जातात. त्यामुळे डिजिटल प्रणालीमध्ये वस्तू खरेदी करताना काळजी घ्यावी, कोणत्याही जाहिरातीमध्ये ते 30 टक्के सवलत देतो, असे सांगतात. पण अशा कंपनीबद्दल सखोल चौकशी करून माहिती घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणे टळेल, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, संजीवकुमार व्ही कुलकर्णी, ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्य सुनंदा एस काद्रोळीमठ, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, एसपी भीमाशंकर गुळेद, गिरीश पाटील, ऍड. एन. आर. लातूर, जिल्हा ग्राहक रक्षण परिषदेच्या सदस्य पूर्णिमा पट्टणशेट्टी, जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे आदी उपस्थित होते.

Tags: