अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 139 वा स्थापनादिन बेळगावात आज उत्साहात साजरा करण्यात आला.
बेळगाव शहरातील आरटीओ चौक परिसरातील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षाचा 139 वा स्थापना दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काँग्रेस बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पक्ष ध्वज फडकावण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेस नेते बसवराज शेगावी, मोहन रड्डी, प्रदीप एम. जे., शेखर आय. टी., काँग्रेस सेवादल प्रमुख शकील मुल्ला, विनोद सोलापूरे, राजू शिंगे, अन्नपूर्णा असुरकर, केपीसीसी सदस्या आयेशा सनदी,

माजी नगरसेविका जयश्री माळगी, विजय गेज्जी, अकबर तापकीर, इम्रान तापकीर, गिरीश पाटील, अब्दुल मुल्ला यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments