विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी हुक्केरी तालुक्यातील येलिमुन्नोळी गावातील लक्ष्मीदेवी मंदिराचे समुदाह भवन बांधण्यासाठी त्यांच्या अनुदानातून सुमारे 5 लाख रुपये निधी जाहीर केला.

विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी येलिमुन्नोळी लक्ष्मीदेवी मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक मलगौडा, जीनागौडा इमगौडा, कलगौडा मलगौडा, महेश मलगौडा, रोहित चौगला, आप्पासाहेब इमगौडा यांना निधी मंजूर पत्र प्रदान केले.
यासंदर्भात उपाध्यक्ष जिनगौडा इमगौडा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, येलिमुन्नोळीचे ग्रामदैवत लक्ष्मी मंदिराच्या कम्युनिटी हॉलच्या बांधकामासाठी आपल्या अनुदानातून पाच लाख रुपये विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी दिले असून त्याबद्दल लक्ष्मी मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ त्यांचे आभारी असल्याचे सांगितले.
पुजारी आप्पासाहेब इमगौडा म्हणाले की, जत्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी निधी उपलब्ध करून कम्युनिटी हॉल बांधण्याचे आदेश दिले असून सर्व पुजारी व भाविक त्यांचे आभारी असल्याचे सांगितले.
यावेळी मंदिर विश्वस्त समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments