शोटोकॉन कराटे डु स्पोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनलच्या वतीने बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी येथे कराटे बेल्ट आणि प्रमाणपत्र प्रदान समारंभ उत्साहात पार पडला.
शोटोकॉन कराटे डु स्पोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनलच्या चलवेनहट्टी, अगसगा, बेकीनकेरे आणि विजयनगर-हिंडलगा या चार शाखांचा कराटे बेल्ट आणि प्रमाणपत्र प्रदान समारंभ चलवेनहट्टी मराठी शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी अगसगा ग्रापं सदस्या रेखा शट्टूप्पा पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, ग्रापं अध्यक्ष अमृत मुद्देन्नावर, सदस्य यल्लाप्पा पाटील, रेणुका भरमा सनदी, पत्रकार चंद्रकांत कुंडेकर, एसडीएमसी अध्यक्ष मनोहर हुंदरे, मुख्याध्यापक वार्नूळकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन ग्रापं सदस्य यल्लाप्पा पाटील यांनी, सरस्वती पूजन रेणुका सनदी यांनी केले. रेखा पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले. फ्लो
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व शोटोकॉन कराटे डु स्पोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चौथे डॅन ब्लॅक बेल्ट विजेते सेन्सुई भरमानी मल्लाप्पा पाटील यांच्याहस्ते निरपेक्ष समाज सेवेबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली २७ वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार व इन न्यूजचे उपसंपादक चंद्रकांत कुंडेकर यांचा सत्कार करण्यात आला. फ्लो
यावेळी नेत्रा गिंडे हिने देशभक्तीपर गीते सादर केली. कराटेपटू वैभवी मोरजकर, पृथ्वी घेवडे, स्नेहल बडवाण्णाचे यांनी मनोगत व्यक्त केले. विजयनगर शाखेच्या कराटेपटू मुलींनी समूह नृत्य सादर केले. स्फूर्ती नांदवडेकर हिने पुष्पांजली भरतनाट्यम सादर केले. 
समारंभात कराटे प्रशिक्षक भरमानी मल्लाप्पा पाटील व त्यांच्या कुटुंबीयांचा नागरी सत्कार करण्यात आला. ग्रापं अध्यक्ष अमृत मुद्देन्नावर व अन्य पाहुण्यांच्या हस्ते विविध गटातील कराटेपटूंना येलो, ग्रीन, ब्राऊन, पर्पल, ब्लॅक बेल्ट आणि प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.

त्यानंतर चलवेनहट्टी, अगसगा, बेकीनकेरे आणि विजयनगर-हिंडलगा या चार शाखांच्या कराटेपटूंनी कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
यानंतर पाहुण्यांच्या हस्ते यश मेणसे (अगसगा), भक्ती भोवी, डेरेन डोरेस्वामी, स्फूर्ती नांदवडेकर (सर्व विजयनगर शाखा) यांचा ब्लॅक बेल्ट व चषक देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक गजानन नांदवडेकर यांनी केले. नामदेव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या समारंभाला डॉ. चेतन वर्पे, चलवेनहट्टी, अगसगा गावचे आजी-माजी ग्रापं सदस्य, ग्रामस्थ व कराटेपटू, संत मीरा हायस्कूल, विजयनगर, बेकिनकेरे शाखांचे कराटेपटू, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Recent Comments