Belagavi

बेळगावात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती

Share

बेळगावातील खासबाग येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आज साजरी करण्यात आली.

खासबागमधील बाडीवाले कॉलनी टीचर्स कॉलनी येथे आज भाग्यलक्ष्मी संघातर्फे अजातशत्रू माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आज साजरी करण्यात आली. यानिमित्त वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी विनायक कामकर, महावीर कमाल, यल्लाप्पा सुळेभावी, विजय साखळकर, नारायण सावंत, स्मिता अनगोळकर, संगीता बाडीवाले, गीता पाटील, रूपा रायकर, कांचन तलरेजा व दोन्ही कॉलनीतील रहिवाशी उपस्थित होते.

Tags: