Belagavi

बेळगावात विविध चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा

Share

संपूर्ण विश्वाला प्रेम, बंधुभावाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूचा जन्मदिन, ख्रिसमस सामूहिक प्रार्थना करत बेळगावात जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध चर्चमध्ये नाताळनिमित्त सर्व ख्रिश्चन समाजाने विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थना केली.

होय, बेळगावातील बेळगाव डायोसिसच्या आवारातील सेंट फातिमा चर्च, सेंट अँथनी चर्च, मेथोडिस्ट चर्च, इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, वैभवनगर आदी चर्चमध्ये ख्रिसमसचा उत्साह ओसंडून वहात असून काल रात्रीपासून सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.

मेथोडिस्ट चर्चमध्ये पास्टर शांताप्पा अंकलगी, जॉन हंचिनमनी यांनी सर्व भक्तांना येशू ख्रिस्ताचा संदेश दिला. सर्वांना नाताळच्या शुभेच्छा! हा सण सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. सौहार्दाचे प्रतीक असलेला दया आणि करुणेचा हा सण आपण आनंदाने साजरा करू या आणि अशा जगासाठी काम करूया जिथे प्रत्येकजण आनंदी आणि निरोगी असेल, असे ते म्हणाले. ख्रिस्ती समाजाचे लोक चर्चमध्ये जाऊन देवाला प्रार्थना करत आहेत.

बेळगावातील चर्चमध्ये 25 डिसेंबर रोजी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. नाताळ हा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो. या पवित्र दिवशी आपण येशू ख्रिस्ताचे स्मरण करूया, ज्याने मानवी जगाला अहिंसेचे महत्त्व आणि शांतीच्या संदेशाचे सार सांगितले. देशातील सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. हा सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य आणि शांती घेऊन येवो हीच सदिच्छा.

यावेळी बेळगावातील फातिमा चर्च, सेंट अँथनी चर्च आणि मेथोडिस्ट चर्चमध्ये ख्रिश्चन समाजाने विशेष प्रार्थनेत सहभाग घेतला. दरम्यान, ख्रिश्चन समाजाची बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या कॅम्प परिसरात सर्वत्र ख्रिसमसचा जल्लोष दिसून येत आहे. ठिकठिकाणी चांदण्या, आकाशदिवे लावून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. घरांसमोर तसेच चर्चमध्ये प्रभू येशूच्या जन्मसोहळ्याचे येशू आणि माता मेरी यांच्या प्रतिमांसह विद्युत रोषणाईसह आकर्षक देखावे उभारण्यात आले आहेत.

Tags: