नगरसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकाराने टिळकवाडी भंगी पॅसेज मध्ये पथदीप बसवण्यात आले.

मिलेनियम गार्डन मध्ये वॉर्ड क्र.29 च्या नागरिकांबरोबर झालेल्या मीटिंग मध्ये लोकांनी टिळकवाडी येथील भंगी पॅसेज मध्ये पथदीप बसवण्याची मागणी केली होती . त्यानुसार नगरसेवक नितीन जाधव यांनी आठ दिवसाच्या आत ही मागणी पूर्ण करून या बोळात पथदीप लावले . आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक नितीन जाधव यांच्या प्रयत्नांमुळे टिळकवाडी येथील सोमवार पेठ ते शुक्रवार पेठ भंगी पॅसेज संपूर्ण स्वछ करून तेथे लाइट्स लावण्यात आले आहेत .
टिळकवाडी परिसर अस्तित्वात आल्या पासुन प्रथमच असे कार्य राबविण्यात आले आहे. नागरिकांनी भंगी पॅसेजचा वापर कचरा टाकण्यासाठी न करता सर्व्हिस रोड म्हणून त्याचा वापर करावा जसे की दुचाकी पार्किंग साठी, वॉकिंग, येण्या जाण्या साठी त्याचा वापर करावा असे आवाहन नगरसेवक नितीन जाधव यांनी केले आहे. आ अभय पाटील आणि नगरसेवक नितिन जाधव यांनी आपला शब्द पाळल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि त्यांचे आभार मानले.


Recent Comments