Belagavi

बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे ‘अपराध नियंत्रण मास’

Share

बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे सध्या ‘अपराध नियंत्रण मास’ पाळण्यात येत आहे. यानिमित्त पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांचे उद्यमबाग येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष व्याख्यान झाले.

उद्यमबाग येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांना अपराध नियंत्रण महिन्यानिमित्त पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी संबोधित केले.
अपराध प्रतिबंध महिन्यानिमित्त संबोधित करताना पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी, विद्यार्थी आणि शिक्षकांना, अंमली पदार्थांचे सेवन व त्याचे दुष्परिणाम, गुन्हेगारी प्रतिबंध,

महिला आणि मुलांची सुरक्षा, रस्ता सुरक्षा याविषयी माहिती दिली. यावेळी केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Tags: