बेळगाव शहरातील खाद्यप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायदेखील बहरत चालला आहे. आता जाधवनगर डबल रोड परिसरात ‘हॉटेल राधेकृष्ण’च्या खवय्यांच्या सेवेत एक नवे दालन सुरु झाले आहे. आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या हस्ते या हॉटेलचे शानदार समारंभात उदघाटन करण्यात आले.

होय, बेळगाव शहराचा महानगरात झपाट्याने विस्तार होत चालला आहे. त्याचबरोबर येथे खाद्यप्रेमींची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे खवय्यांच्या सेवेत अनेक नवनवीन शाकाहारी व मांसाहारी हॉटेल्स, उपहारगृहे दाखल होत आहेत. अशाच पद्धतीने बेळगावातील जाधवनगर डबल रोड येथे हॉटेल राधेकृष्णच्या रूपाने खवय्यांची क्षुधाशांती करण्यासाठी एक नवे शुद्ध शाकाहारी दालन सुरु करण्यात आले आहे.
जाधवनगर डबल रोड येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या शानदार समारंभात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते हॉटेल राधेकृष्णचे थाटात उदघाटन करण्यात आले.
यावेळी हॉटेल राधेकृष्णचे मालक-संचालक चौकसिंग पुरोहित, स्केटींग कोच सूर्यकांत हिंडलगेकर, शिवराज एस. राज, दिनेश आंबिगा, विनोद बामणे, मंजुनाथ मंडोळकर, रवी राजपुरोहित, डॉ. बडेभाई, सागर पाटील आदी उपस्थित होते. हॉटेलच्या उदघाटनानिमित्त स्केटींग खेळाडू जयध्यान राज, रश्मिता अंबिगा, मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित, हिरेन राज, साईराज मेंडके व स्केटींग कोच सूर्यकांत हिंडलगेकर यांचा शानदार सत्कार करण्यात आला.

उदघाटनानिमित्त मनोगत व्यक्त करताना हॉटेल राधेकृष्णचे मालक-संचालक चौकसिंग पुरोहित यांनी सांगितले की, आमच्या हॉटेल राधेकृष्णची पहिली शाखा बेळगावातील टिळक चौक येथे 6 वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली असून, त्याला बेळगावकर चोखंदळ ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या प्रतिसादामुळे प्रभावित होऊन आम्ही आता रेसकोर्स रोड येथे आमची दुसरी शाखा सुरु करीत आहोत. या ठिकाणी खाद्यप्रेमींना पसंत पडेल असे शुद्ध शाकाहारी, सात्विक, चवदार भोजन उपलब्ध करून देण्यात येईल. त्याला ग्राहकांनी पूर्वीप्रमाणेच प्रतिसाद देऊन सहकार्य करावे. हॉटेल राधेकृष्णमध्ये नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, पंजाबी अशा देशभरातील विविध प्रांतांच्या लज्जतदार डिशेस उपलब्ध असतील. खाद्यप्रेमींनी सहकुटुंब हॉटेल राधेकृष्णला एकदा अवश्य भेट देऊन येथील खाद्यपदार्थांचा जरूर आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
एकंदर, हॉटेल राधेकृष्णमुळे रेसकोर्स रोड, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, सदाशिवनगर, विनायकनगर, विजयनगर आदी परिसरातील आणि एकूणच समस्त बेळगावकरांना शुद्ध सात्विक, चवदार, रसना तृप्त करणारे देशभरातील विविध प्रांतांचे खाद्यपदार्थ चाखण्याची संधी मिळणार आहे. खवय्या ग्राहकांच्या पसंतीला ते नक्कीच उतरेल असा विश्वास आहे. तुम्हीही एकदा येथे अवश्य भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असा आमचा तुम्हाला आग्रह आहे


Recent Comments