Vijayapura

विजयपुर येथे 24 डिसेंबर रोजी मादिग स्वाभिमान संमेलन

Share

24 डिसेंबर मादिग स्वाभिमान संमेलन आयोजित करण्यात आले आहे . असे भाजप जिल्हा उपाध्यक्ष उमेश कारजोळ व हणमंत बिरादार यांनी सांगितले.

विजयपुर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, 24 डिसेंबर रोजी शहरातील साई गार्डन , इटगी पेट्रोल पंपाजवळ सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच अंतर्गत आरक्षणासाठी केंद्र सरकारला यापूर्वीच विनंती करण्यात आली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून हे स्वाभिमान संमेलन होणार आहे. केंद्रीय मंत्री ए नारायण स्वामी, माजी उपमुख्यमंत्री गोविंदा कारजोळ , आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत . त्या दिवशी बसवमूर्ती मादार चन्नय्या यांचे दिव्य सान्निध्य कार्यक्रमाला लाभणार आहे . . या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विजयपूरचे खासदार रमेश जिगजीनगी राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी , जनतेने मोठ्या संख्येने यावे, असे ते म्हणाले.

Tags: