Banglore

विरोधी खासदारांचे निलंबन ही लोकशाहीची हत्या : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

देशातील कसलीही परिस्थिती असो, त्याची पर्वा न करता मोदी अशा कोणत्या विमानाने प्रवास करतात? हे भाजपला आधी विचारा असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, देशात कोणतीही परिस्थिती असली तरी मोदी कोणत्या विमानाने प्रवास करतात? ते कसले विमान आहे?. कर्नाटकचे गृहनिर्माण, अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ मंत्री जमीर अहमद खान यांच्यासोबत आलिशान विमानात प्रवास केल्याबद्दल टीका करणाऱ्या भाजपला सिद्धरामय्या यांनी जाब विचारला. मोदींचे विमान आलिशान नाही का, अशी विचारणा त्यांनी केली. देशातील परिस्थितीची पर्वा न करता मोदी कोणत्या विमानाने प्रवास करतात ते आधी भाजपला विचारा, असे सिद्धरामय्या म्हणाले.

लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी खासदारांच्या निलंबनावरून केंद्र सरकारवर टीका करताना सिद्धरामय्या म्हणाले की, ही लोकशाहीची हत्या आणि हुकूमशाहीचे टोक आहे. भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि ते विरोधकांचे ऐकत नाहीत, याचा अर्थ काय? देशात लोकशाही नाही असे वातावरण भाजप निर्माण करत आहे. आगामी निवडणुकीतही जनता त्यांना धडा शिकवेल, असे ते म्हणाले.

सिद्धरामय्या म्हणाले की, कोविडच्या भीतीमुळे पर्यटन स्थळे बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हैसूरमध्ये 6 लोक कोविड पॉझिटिव्ह आहेत. म्हैसूरच्या कोरोना रुग्णांना प्रवासाचा इतिहास नाही. ते वेगवेगळ्या रोगांनी पीडित असल्याचे दिसून आले आहेत. प्रत्येकाने कोविड नियम-धोरणाशी सुसंगत राहून सावधगिरी बाळगली पाहिजे, असा सल्ला सिद्धरामय्या यांनी दिला.

Tags: