Hukkeri

हुक्केरीतील बेनकनहोळी गावाजवळ परिवहन बसवर दगडफेक :दोघांना अटक

Share

हुक्केरी तालुक्यातील बेनकनहोळी गावाजवळ परिवहन बसवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हुक्केरी तालुक्यातील बेनकनहोळी गावाजवळ परिवहन बसवर फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. परशराम नायक (24) आणि बसवराज शिंदे (26,) ( दोघेही रा. बेनकनहोळी) यांना अटक करण्यात आली. हे दोघेही गोव्यात काम करतात.

गुरुवारी रात्री हुक्केरीहून बेळगावकडे जात असताना बेनकनहोळी गावाजवळ बसच्या डाव्या बाजूच्या खिडकीवर दगडफेक करण्यात आली. बसमधून प्रवास करणारा हुक्केरी अग्निशमन केंद्राचा चालक रमेश या दगडफेकीत जखमी झाला. याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे एसपींनी सांगितले.

Tags: