संसदेच्या दोन्ही सभागृहात खासदारांच्या निलंबनाचा निषेध करत चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली.

शहरातील पर्यटक मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा बसव सर्कलमध्ये पोचल्यावर त्या ठिकाणी मानवी साखळी तयार करून , केंद्रातील भाजप सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला
यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की, या देशात कायदेशीर घटना नाही.राज्यसभा आणि लोकसभेत विरोधी पक्षाने विधायक प्रश्न विचारले असता सत्ताधाऱ्यांनी सुमारे 145 खासदारांना निलंबित केले.असे होऊ नये. पुढील लोकसभा निवडणुकीत जनता भाजप सरकारला चोख उत्तर देईल, असेही ते म्हणाले.
यावेळी , सतीश कुलकर्णी, एच.एस. नसलापुरे, राजू कोटगी, शंकर गौडा पाटील, गणेश मोहिते, दस्तगिर कागवाडे, नामदेव कांबळे, निर्मला पाटील, जास्मिन, सागर पिंगट, सिद्धार्थ शिंगे, यलप्पा शिंगे, अब्दुलसत्तार मुल्ला, दिलीप जमादार, अवधूत गुरव , प्रतीक्षा, भूषण ,रावसाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments