इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या बेळगाव जिल्हा शाखेने 2021-22 या वर्षातील सर्वांगीण उपक्रमांच्या श्रेणीमध्ये ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा शाखा पुरस्कार’ पटकावला आहे.
रेडक्रॉस सोसायटी, बेळगाव शाखेच्या सदस्यांचा कर्नाटकचे माननीय राज्यपाल आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी, कर्नाटक राज्य शाखा अध्यक्ष थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते राजभवन येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2021-22 मध्ये सत्कार करण्यात आला.
हा पुरस्कार जिल्हा शाखा अध्यक्ष डॉ. सुरेश बी. कुलकर्णी; सचिव, डॉ. सुमंत एस. हिरेमठ, खजिनदार प्रिया पुराणिक आणि कार्यकारी समिती सदस्य विकास कलघटगी यांनी स्वीकारला.
याबद्दल इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बेळगाव जिल्हा शाखेला रेडक्रॉस कर्नाटक राज्य शाखा आणि इतर जिल्हा शाखांच्या प्रतिनिधींनी शुभेच्छा दिल्या.


Recent Comments