बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राम पंचायत हद्दीतील देवगिरी गावची श्री महालक्ष्मी यात्रा १४ ते १८ मे २०२४ पर्यंत साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त बळीचा पालवा व रेडा सोडण्याचा कार्यक्रम गावात पार पडला.

गावभर धनगरी ढोल व करडी मजल वाद्यांच्या गजरात भंडारा उधळत श्री महालक्ष्मी देवीच्या जयघोषासह बळीचा पालवा व रेड्याची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक धार्मिक विधिसह पुजन व सुहासिनी महिलांनी देवीची सामुहिक ओटी भरली. त्यानंतर लक्ष्मी देवीची मूर्ती हलवुन रंग करण्यासाठी पाठवून देण्यात आली.
कडोली गावचे हक्कदार कमिटी अध्यक्ष श्री मधु पाटील व कमिटीतर्फे महातंगी देविची विधिवत पुजनासह ओटी भरल्यानंतर कणबर्गिचे राणग्या हनुमंत असोदे यांच्यातर्फे बळीचा पालवा व रेड्याची पूजा करुन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी ग्रापं सदस्य गौडाप्पा पाटील, श्री जोमलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी अध्यक्ष रामा चिनमरी, ग्रापं सदस्य बाबु बडीगेर, प्रभु कुंबर्गी, आनंद कुंबर्गी, निंगाप्पा अंकी, माजी ग्रापं उपाध्यक्ष बाबु पाटील, श्रीशैल संपगावि, निंगाप्पा पाटील, सिद्धाप्पा अंकी, सुरेश अंबेवाडी, बसु पाटील, निंगाप्पा पाटील, बस्साप्पा बसर्गी, तिप्पाण्णा नाईक, रामचंद्र बडिगेर, निंगाप्प्प कुंबर्गीसह श्री जोमलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी, श्री महालक्ष्मी देवस्थान पंच कमिटी, सर्व युवक मंडळे, महिला मंडळांसह सर्व संघ-संस्थांचे पदाधिकारी, हक्कदार,पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments