कोरोना विषाणूमुळे पाच दिवसांपूर्वीच राज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.
बेंगळूर येथे आज पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, बेंगळुरच्या चामराजपेट येथील रहिवासी 64 वर्षीय व्यक्तीला कोरोनासोबत इतर आजारही होते. त्यांना टीबी, बीपीसह फुफ्फुसाचा त्रास होता. दरम्यान, त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 5 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मृताच्या कुटुंबातील एकूण 5 सदस्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यावेळी पाचही जण निगेटिव्ह आले आहेत. सध्या पाच जण क्वारंटाईनमध्ये आहेत. बीबीएमपी मृत व्यक्तीच्या जीनोमिक अनुक्रम अहवालाची वाट पाहत आहे, असे ते म्हणाले.
कोरोना विषाणूत तीन महिन्यांपासून वाढ झाली आहे. ही उपप्रजाती ऑगस्टमध्ये दिसून आली. हा एक जलद पसरणारा विषाणू आहे जो ओमिक्रॉन सारखा वागतो. फार हानीकारक व्हायरस नाही. देशात अशी 20 प्रकरणे आढळली आहेत. याबाबत कर्नाटक सर्वाधिक चाचणी करत आहे. देशात सर्वात जास्त चाचण्या आमच्याकडे आहेत. आम्ही मंगळवारी एकाच दिवशी 772 जणांची चाचणी केली. सारी आणि आयएलआय विषाणू ओळखण्यासाठी ऍडव्हायझरी जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments