पाटबंधारे विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना एक लाखाची लाच घेताना हावेरी लोकायुक्तांनी छापा टाकून रंगेहात पकडले. पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातच ही लाच घेताना मंजुनाथ बी. आणि प्रकाश होसमनी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
हावेरी जिल्ह्यातील शिग्गावी पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मंजुनाथ आणि कनिष्ठ अभियंता प्रकाश होसमनी यांनी ठेकेदार बाळकृष्ण नायक यांच्याकडे त्यांचे काम करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. हावेरी जिल्ह्यात करावयाच्या रस्त्यांच्या कामाचे पहिले बिल या अधिकाऱ्यांनी लाच घेऊन मंजूर केले होते. नंतर अंतिम बिल पास करण्यासाठी त्यांनी पुन्हा लाच मागितली. त्याबाबत ठेकेदार नायक यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, हे पैसे घेताना लोकायुक्तांनी सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले.


Recent Comments