Belagavi

अट्टल चोरट्याला अटक : सात लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Share

बेळगाव शहर , आणि उपनगरांमध्ये चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून , ७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

बेळगाव शहर परिसरात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे . याची गांभीर्याने दखल घेत , शहर पोलीस आयुक्त एस एन सिध्दरामप्पा , उपयुक्त रोहन जगदीश , गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या उपायुक्त पी व्ही स्नेहा , मार्केट पोलीस ठाण्याचे एसीपी जगदीश कट्टीमनी , यांच्या मार्गदर्शनाखाली , माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कालीमिर्ची आणि त्यांच्या सहकाऱ्यानी कारवाई करीत , परशराम इराप्पा दंडगल (वय ३२ ), राहणार गुरुदेव गल्ली , लक्ष्मी नगर , जुने बेळगाव या अट्टल चोरट्याला अटक केली

त्याने शहर व इतर परिसरात चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे . पोलिसांनी त्या अटकेतील आरोपीकडून , ६ लाख रुपये किमतीचे सोनीचे दागिने तसेच , एक लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता , त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली .

Tags: