Dharwad

धारवाडमध्ये सीबीटीजवळील दुकानाला मध्यरात्री आग

Share

धारवाडमधील सीबीटीजवळ असलेल्या एका दुकानाला सोमवारी मध्यरात्री आग लागून बहुतेक सर्व वस्तू जळून खाक झाल्या.

धारवाड येथील सीबीटी जवळील एका दुकानाला आग लागली असून बहुतांश वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शहरातील सीबीटी जवळील श्री दुर्गा परमेश्वरी मंदार्थी नामक बेकरी उत्पादने व अन्य साहित्याच्या दुकानाला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. दुकानातून धूर येताना पाहून स्थानिकांनी दुकान मालक आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी पोहोचून दुकानाचे शटर उघडून आग विझवली.

या दुकानाशेजारी रांगेने अनेक दुकाने असून, शेजारील दुकानांमध्ये आग पसरण्यापूर्वीच अग्निशमन दलाने आग विझविल्याने आजूबाजूच्या दुकानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या या आगीत दुकानातील बहुतांश माल जळून खाक झाला असून, शहर स्थानकाच्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे.

Tags: