Dharwad

शासनाकडून शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ :धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Share

शिक्षण विभागात रिक्त पदे शासनाने भरावीत या मागणीसाठी AIDYO संघटनेच्या सदस्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

शिक्षण क्षेत्रातील विशेष शिक्षकांच्या नियुक्तीविना अनेक दशके उलटली आहेत. मात्र, सरकार शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगत त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

शासनाने जागे होऊन शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या कला, संगीत, नाट्य कला व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा येत्या काळात राज्यभर तीव्र संघर्ष छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Tags: