बेळगाव उतरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते आसदखान सोसायटी-वीरभद्रनगर येथे गटारीच्या कामाला भूमिपूजन करून चालना देण्यात आली.
बेळगाव महानगर पालिकेला गटारीच्या कामांसाठी विशेष सरकारी अनुदान प्राप्त झाले आहे. आसदखान सोसायटी-वीरभद्रनगर येथे गटारींचे काम करण्याची रहिवाशांची मागणी होती. त्यामुळे या विशेष अनुदानातून याठिकाणी गटारीच्या कामाचा आ. राजू सेठ यांच्याहस्ते आज. मंगळवारी भूमिपूजन करून चालना देण्यात आली.
यावेळी बोलताना आ. राजू सेठ यांनी, रहिवाशांना आपल्या परिसरातील गटारी स्वच्छ ठेवण्याची सूचना केली. गटारींमध्ये प्लास्टिक अथवा जड कचरा टाकल्याने सांडपाण्याचा निचरा नीट होत नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे गटारींमध्ये प्लास्टिक, कचरा टाकू नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नगरसेविका रेश्मा बैरकदार, अमन सेठ यांच्यासह मनपा अधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


Recent Comments