येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत निर्माणाधीन श्री राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त 1 ते 15 जानेवारी या कालावधीत देशव्यापी घरोघरी मंत्राक्षता आणि पत्रक वाटप मोहीम बेळगाव जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे कोषाध्यक्ष कृष्णा भट्ट यांनी सांगितले.
बेळगाव येथे आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना कृष्णा भट म्हणाले की, श्री रामजन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत देशभरात घरोघरी मंत्ररक्षा आणि पत्रक वाटप मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम बेळगाव जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.
ते म्हणाले, विश्व हिंदू कार्यकर्ते बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख घरोघरी जाऊन अयोध्येतील कार्यक्रमासाठी मंत्राक्षता आणि प्रभू रामाच्या चित्र असलेल्या पत्रकांचे वाटप करतील. 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत नागरिकांनी आपापल्या घरांजवळच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा, भजन आदी धार्मिक उपक्रम साजरे करावेत असे आवाहनही त्यांनी केले. बाइट
पत्रकार परिषदेला दत्ता नाईक, गणेश चौगले, आदिनाथ आवडे, संतोष मडिगार आदी उपस्थित होते.


Recent Comments