बेळगाव येथील केपीटीसीएल आणि हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हम्मनावर यांनी आयजी स्टेडियम, दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले.
14-17 डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या पॅरा टेबल टेनिसच्या उपांत्य फेरीत संजीव हम्मनावर यांनी संजीव हजेरी यांचा 3-0 असा पराभव केला.
अंतिम फेरीत त्यांना हरियाणाच्या यागेश नाडारकडून 3-1 असा पराभव पत्करावा लागला.
संजीव हम्मनावर हे चार वेळा राष्ट्रीय विजेते असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही पदके जिंकली आहेत. आता पुन्हा रौप्यपदक जिंकून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.


Recent Comments