Belagavi

महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवगिरीत उद्या विविध धार्मिक कार्यक्रम

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राम पंचायत हद्दीतील देवगिरी गावची श्री महालक्ष्मी यात्रा १४ ते १८ मे २०२४ पर्यंत करण्याचा निर्णय देवस्थान पंच कमिटी, ज्येष्ठ वडिलधारी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहमतीने घेण्यात आला आहे. यानिमित्त उद्या मंगळवार दि.१९/१२/२३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

 

आगामी महालक्ष्मी यात्रेनिमित्त देवगिरी येथे उद्या धनगरी ढोल वाद्य व पारंपारिक धार्मिक विधींसह बळीचा पालवा व रेडा सोडणे, ग्रामस्थांकडून ओटी भरणे व श्री महालक्ष्मी मूर्ती हलवून रंग करण्यासाठी पाठवून देण्यासह विविध धार्मिक कार्यक्रम उद्या होणार आहेत. यानिमित्त गावामध्ये कोलकार मार्फत दवंडी पिटुन कडकडीत वारही पाळण्यात येणार आहेत. गावातील जोमलिंग, श्रीमहालक्ष्मी व सर्व देवळांचे देवस्थान पंच मंडळी, आजी-माजी ग्रापं अध्यक्ष व सदस्य, सर्व युवक मंडळे व महिला मंडळासह ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सर्व तर्हेचे सहकार्य करुन यात्रा महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन आज झालेल्या देवस्थान पंच कमिटी व ग्रापं सदस्यांच्या पूर्वतयारीच्या बैठकीत यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री जोमलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी अध्यक्ष रामा चिनमरी यांनी अधिक माहिती दिली.

त्यानंतर बोलताना ग्रापं सदस्य गौडाप्पा पाटील यांनी यात्रेची व उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली.

यावेळी ग्रापं सदस्य बाबु बडीगेर, प्रभु कुंबर्गी, आनंद कुंबर्गी, निंगाप्पा अंकी, माजी ग्रापं उपाध्यक्ष बाबु पाटील, श्रीशैल संपगावि, निंगाप्पा पाटील, सिद्धाप्पा अंकी, सुरेश आंबेवाडी, बसु पाटील, निंगाप्पा पाटील, बस्साप्पा बसर्गी, तिप्पाण्णा नाईक, रामचंद्र बडिगेर, निंगाप्पा कुंबर्गी यांच्यासह श्री जोमलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी, श्री महालक्ष्मी देवस्थान पंच कमिटीसह सर्व संघ-संस्थांचे पदाधिकारी, हक्कदार, पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: