राजधानी बेंगळुरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने 20 हून अधिक ठिकाणी आज छापे टाकले. दरम्यान, शहरात काही स्लीपर सेल आहेत, त्याची माहिती मिळाल्यानेच एनआयएने हे छापे टाकलेत अशी प्रतिक्रिया गृहमंत्री जी परमेश्वर यांनी छाप्यानंतर दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, एनआयएने काही माहितीवर छापा टाकला आहे. छाप्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएने काही माहिती शेअर केलेली नाही. कधी ते माहिती देतात, कधी नाही.
बेंगळूरमध्ये एनआयएचे कार्यालय आहे. तेथील अधिकाऱ्यांनी शहरातील शिवाजीनगर, चिन्नाप्पा गार्डन, पुलकेशीनगर, सुलतानपल्या, आरटी नगर, जेसी नगर यासह 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, राष्ट्रीय तपास यंत्रणेला काही माहिती मिळाली आहे, त्यामुळे त्यांनी छापा टाकला आहे, ते काही गोष्टी शेअर करतात तर काही गोष्टी शेअर करत नाहीत.


Recent Comments