चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावातील शासकीय वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते, या बाजाराला मुलांचा व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला व मुलांमध्ये व्यवसायाचे ज्ञान वाढण्यास मदत झाली.

शाळेच्या आवारात शालेय मुलांनी भाजीपाला, फळे , नाष्टा , , भेळ, वडापाव, पाणीपुरी असे अनेक स्टॉल लावले. गावातील इतर शाळांतील मुले व ग्रामस्थ, महिलांनी या बाजारात येऊन वस्तूंची खरेदी करून चांगला प्रतिसाद दिला. या बाजारामुळे , मुलांमध्ये व्यवसायाचे ज्ञान तर वाढलेच, पण मुलांना आनंदी करण्यातही ते यशस्वी झाले.
यावेळी एसडीएमसी अध्यक्ष बाजीराव डोणवडे, आनंद जाधव (महाराजू), कल्लाप्पा कांबळे, इसाक आवटी, महावीर कोळी, चंद्रशेखर यडूरे, शिवाजी जाधव, रुपाली इंगळे, कावेरी शास्त्री, स्वाती घोशरवाडे, संतोष कोकणे, मुख्याध्यापक ए.डी. भोसले, शिक्षक के.जे. गोडेकर, एस.बी. कांबळे, बेन्नाडी, प्रतिभा खोत व इतर सर्व शिक्षकांसह शाळेतील मुले, गावातील विविध शाळांचे विद्यार्थी व ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.


Recent Comments