Belagavi

वंटमुरी महिला अत्याचार प्रकरण सीआयडीकडे

Share

वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सीआयडी या प्रकरणाचा तपास करणार असून, सीआयडीचे डीआयजी सुधीरकुमार रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक बेळगावात दाखल झाले आहे.

सीआयडीचे डीआयजी सुधीरकुमार रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाचे आज बेळगावात आगमन झाले. त्यांनी हिंडाल्को कंपनीच्या गेस्ट हाऊसवर बैठक घेतली. सीआयडीचे एसपी पृथ्वीक, रश्मी परड्डी आणि डीवायएसपी अंजुमाला नायक यांच्यासह 6 अधिकाऱ्यांचे पथक आज वंटमुरी गावातील घटनास्थळी भेट देईल.

तसेच हे अधिकारी पीडित महिलेची भेट घेऊन माहिती गोळा करतील. याशिवाय ते घटनेशी संबंधित साक्षीदार गोळा करून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणार आहेत.

Tags: