नवीन वर्षाची चाहूल लागताच प्रत्येकाला आठवतो तो बेळगावचा रोटरी अन्नोत्सव … विविध प्रांतांचे शाकाहारी , मांसाहारी पदार्थ , चमचमीत डिशेश , सोबत मनोरंजनाचा खजाना घेऊन बेळगाव रोटरी क्लबकडून यंदाही 5 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 पर्यंत रोटरी अन्नोत्सव होणार आहे . या रोटरी अन्नोत्सवाचे आज भूमीपूजन करण्यात आले .
अतिशय नीटनेटके नियोजन , पार्किंग व्यवस्था , आणि कार्यक्रमांची सुसुत्रता आणि देशातील विविध राज्यांच्या प्रसिद्ध पदार्थांचा आस्वाद घेत , मनोरंजनाचा मनमुराद आनंद आणि स्पर्धात्मक वातावरण यामुळे गेल्या २७ वर्षांपासून रोटरीच्या अन्नोत्सवची दरवर्षी अखंड मालिका सुरु आहे . यंदाही बेळगावच्या सीपीएड मैदानावर , विस्तीर्ण जागेत , रोटरी अन्नोत्सव आपल्या भेटीला येत आहे . आज या रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या अन्नोत्सवासाठी भूमिपूजन करण्यात आले .
यासंबंधी माहिती देताना इव्हेंट चेअरमन , सुनीश मेत्राणी यान इसांगितले कि , 5 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान रोटरी कॅल्कब ऑफ बेळगाव आयोजित रोटरी अन्नोत्सव आयोजित केला जाणार आहे . दहा दिवस खाद्यपदार्थांची लयलूट तसेच मनोरंजनाच्या परिपूर्ण असा हा अन्नोत्सव बेळगावकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे . पहिल्या दिवशी ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा तसेच दुसऱ्या दिवशी मिसेस बेळगाव ही महिलांसाठी सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाणार आहे . 15 ते 20 राज्यांच्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल या अन्नोत्सवात असून खवय्यांना त्यांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ चाखायला मिळणार आहेत . यावेळी जागाही विस्तीर्ण आहे शिवाय पार्किंगची देखील उत्तम सोय करण्यात येणार आहे . सर्वानी अन्नोत्सवाला भेट देऊन, एन्जॉय करा असे आवाहन त्यांनी केले
रोटेरियन डॉ . संतोष पाटील यांनी सांगितले कि , यावर्षी काश्मिरी ,लखनौ , बिहार , दिल्ली , हैद्राबाद , पंजाब ,चंदीगड , आदी ठिकाणचे कुझिन्स असणार आहेत . दरदिवशी 15 ते 20 हजार लोक अन्नोत्सवाला भेट देण्याची अपेक्षा आहे . जनतेसाठी पार्किंगची देखील मोठी व्यवस्था करण्यात येत आहे . यावर्षी 1, 80,000 चौरस फूट क्षेत्रात अन्नोत्सव होणार आहे . ( )
तर रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धण्णावर यांनी सांगितले कि , यंदा अन्नोत्सवाचे हे 27 वे वर्ष आहे . पहिला अन्नोत्सव लिंगराज कॉलेजच्या मैदानावर झाला होता . मागील महिन्यात आम्ही , वर्ल्ड फूड फेस्टिवल भेट देऊन , तिथल्या काश्मीर , लखनौ , दिल्ली , पंजाब , चंदीगड , राजस्थान आदी ठिकाणच्या स्टॉलधारकांना निमंत्रित केले आहे . बेळगावच्या लोकांना विविध प्रांतांचे खाद्यपदार्थ चाखायला मिळावे हा हेतू आहे . त्याचप्रमाणे , पुणे , गोवा तसेच बेंगळूरहून ऑर्केस्ट्रा येत आहेत ..

दरवर्षी अन्नोत्सवातून मिळणाऱ्या फायद्यातून आम्ही बेळगावच्या जनतेसाठी सामाजिक उपक्रम राबवतो . यंदा अन्नोत्सवात 155 स्टॉल्स असून , शाकाहारी ,मांसाहारी कंझ्युमर स्टॉल तसेच , अम्युझमेंट पार्क देखील असणार आहे . शिवाय लहान मुलांना घेऊन येणाऱ्या महिलांसाठ , बेबी चेंजिंग रूम तसेच बेबी फिडींग रूमची सोया देखील करण्यात येणार आहे . अन्नोत्सवासाठी विविध विभागांचा चांगला पाठिंबा लाभला आहे . यावर्षी देखील बेळगावकरानी अन्नोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी मनोज मायकल , तुषार पाटील , संजय कुलकर्णी , मनोज पै आणि इतर उपस्थित होते .


Recent Comments