Belagavi

वंटमुरी घटनेच्या निषेधार्थ खासदारांची संसद भवनासमोर निदर्शने

Share

बेळगावातील वंटमुरी महिला अत्याचार घटनेवरून राज्यातील भाजप खासदारांनी आज राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात संसद भवनासमोर निदर्शने केली.

बेळगाव जिल्ह्यातील नवीन वंटमुरी गावात अनुसूचित जमातीतील महिलेला विवस्त्र करून खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. सुवर्ण विधानसौध येथे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच अशी घटना घडल्याने राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे दर्शन घडते. दलित महिलेवरील या घृणास्पद अत्याचाराच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी आणि राज्यातील भाजप खासदारांनी राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात संसद भवनासमोर निदर्शने केली.

यावेळी खासदार नलिनकुमार कटील, सदानंद गौडा, पी.सी.मोहन., के. नारायण, रमेश जिगजिनगी, जी.एम. सिद्धेश्वर, वाय. देवेंद्रप्पा, जीएस बसवराज यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते.

Tags: