Belagavi

अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या प्रश्नांवर चर्चा पण निर्णय मात्र काहीच नाही

Share

एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2007 मध्ये उत्तर कर्नाटकच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार बेळगावात हिवाळी अधिवेशने होत आहेत. यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजले. परंतु यावेळच्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकच्या विकासावर फारच कमी चर्चा झाली. मोजके सत्ताधारी आणि विरोधी आमदार वगळता बहुतांश आमदारांनी बंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू भागांवर केंद्रित चर्चा केली.

या अधिवेशनात विरोधी पक्षनेते आर अशोक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आमदार सत्ताधारी पक्षाला बांधून ठेवण्यात अपयशी ठरले. राज्य दुष्काळाने होरपळले असून, विशेषत: उत्तर कर्नाटक दुष्काळाने होरपळत आहे,

उत्तर कर्नाटकच्या दुष्काळ व्यवस्थापनाच्या कामांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. विधानसभा आणि विधानपरिषदेतही सरकारने त्यांचे ऐकले नाही. लोकसभेतील घुसखोरीच्या घटनेनंतर शेवटच्या दोन दिवसात सुवर्णसौध भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले.

शेवटच्या दिवशी उत्तर कर्नाटकातील आमदार अरविंद बेल्लद, गणेश हुक्केरी, विठ्ठल हलगेकर, दुर्योधन ऐहोळे, बसनगौडा पाटील-यत्नाळ, कोनरेड्डी, प्रसाद अब्बय्या, लक्ष्मण सवदी, राजू कागे आदी आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित केले. उत्तर कर्नाटकातील जलाशयातील पाणीसाठा रोखून धरला तरी तोडगा निघाला नाही.

म्हादई प्रकल्पाबाबत आरोप-प्रत्यारोप करण्यात दोन्ही पक्षांनी वेळ घालवला. मात्र कावेरी मेकेदाटूवर चर्चा करून उत्तर देण्यास सरकार उत्सुक असल्याचे दिसून आले. दरम्यान या संदर्भात अनेक आमदार, विधान परिषद सदस्यांनी आपली मते प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

Tags: