टिपू जयंती साजरी करण्यात गैर काय? असा सवाल करून , आमदार प्रसाद अब्बय्या यांनी भाजप जातीपातीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला .
बेळगावातील सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी टिपू जयंती साजरी केली तर ते चुकीचे आहे का ? आम्ही देशभक्ताच्या नावाने जयंती साजरी करू, भाजप त्याला विरोध करेल, आम्हाला पर्वा नाही, भाजपचा अजेंडा जातीचा आहे, असा संताप व्यक्त केला. ते राजकारण आणि जातीत विषाची बीजे पेरतात.
म्हैसूर विमानतळाला टिपूचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव मी सभागृहात मांडला आहे, भाजपने याला विरोध केला आहे, भाजप मुस्लिम राष्ट्रीय नेत्यांना विरोध करत आहे, टिपू हा राष्ट्रप्रेमी नसून स्वातंत्र्यसैनिक आहे, त्याने म्हैसूर, इंग्रजांविरुद्ध तीन युद्धे लढली आहेत. आपल्या मुलाला ओलीस ठेवण्याचा इतिहास, पण भाजप इतिहासाचा विपर्यास करण्याचे काम करत आहे.. ज्यांना ब्रिटीशांकडून पेन्शन मिळते त्यांना राष्ट्रीय देशभक्त म्हणून भाजप दाखवणार आहे.
आ . प्रसाद अब्बया यांनी ,अप्रत्यक्षपणे सावरकरांच्या फोटो पोस्टिंगवर ताशेरे ओढले.भाजपकडे हिंदू-मुस्लीम अजेंड्याशिवाय काहीही नाही.. ते विकासावर बोलत नाहीत, इतिहास मान्य करत नाहीत, त्यामुळे त्यांचा आक्षेप असणे स्वाभाविक आहे.
प्रसाद अब्बय्या म्हणाले की, मसाल्यांच्या पदार्थांची निर्यात आणि रेशीम व्यापाराच्या वाढीसह अनेक योगदान आहेत. त्यामुळे टिपूचे नाव म्हैसूर विमानतळासाठी साठी योग्य असल्याचा प्रस्ताव आम्ही मांडला आहे. याबाबत मी भविष्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन.. टिपू जयंती नक्कीच साजरी केली पाहिजे. असे ते म्हणाले .


Recent Comments