विजयपूर शहरातील जिल्हा रुग्णालय मार्गावर मालवाहू वाहन पलटी होऊन त्यातून ऑइल गळती झाली . त्या सांडलेल्या ऑइल वरूनच जाणाऱ्या भरधाव कारवरील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे ऑटोला धडक दिली .
या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत .
कार चालकाने त्या तेलात भरधाव वेगात गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कार चालकाने कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटना लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्या आहेत.
विजयपूर वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments