Chikkodi

चिकोडी जिल्हा आंदोलनाला विद्यार्थी व अतिथी व्याख्यात्यांचा पाठिंबा

Share

चिक्कोडी हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीच्या सदस्यांनी केलेल्या धरणे सत्याग्रहाला पदवीधर महाविद्यालयातील विद्यार्थी व अतिथी व्याख्यात्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

चिक्कोडी ह्या वेगळ्या जिल्ह्याच्या मागणीसाठी चिक्कोडी मिनिविधान सौधसमोर झालेल्या धरणे सत्याग्रहाला विद्यार्थी व अतिथी व्याख्यात्यांनी पाठिंबा दर्शवला.यावेळी अतिथी व्याख्याता अजित कोळी म्हणाले की, चिक्कोडी वेगळ्या जिल्ह्यासाठी गेल्या २ दशकांपासून लढा सुरू आहे.

नंतर चिक्कोडी चरमुर्ती मठाचे संपदाना स्वामीजी म्हणाले की, बेळगावात 10 दिवसांचे अधिवेशन सुरु असून , त्यात उत्तर कर्नाटकाबाबत चर्चा झाली पाहिजे.उत्तर कर्नाटकात सिंचन,शिक्षण यासह अनेक समस्या आहेत.उत्तर कर्नाटकातील आमदार व विधान परिषद सदस्यांनी आवाज उठवावा. त्यांनी या समस्यांबाबत आवाज उठवला तरच उत्तर कर्नाटकचा विकास होऊ शकेल.

यावेळी चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष संजू बडिगेर, उपाध्यक्ष श्रीकांत असोदे, सचिव चंद्रकांत हुक्केरी, पुनित राजकुमार फॅन्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल नावी , राजेंद्र पाटीला श्रीकांताचौगला, बाळू कोरे, खानाप्पा बाडकर, सागर भोसले , यल्लाप्पा खोत , शेखर पाटील अशोक भांडारकर , नागव्वा कुरणी , महादेव पुजारी आदी उपस्थित होते.

Tags: