लोकसभेत घुसखोरी करून गोंधळ माजविणारा मनोरंजन नरेंद्र मोदींना देव मानतो, असे त्यांचे वडील म्हणाले आहेत. खोटे धर्मांध कसे असतात हे त्याने दाखवून दिले आहे, असा संताप काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी व्यक्त केला.
बेळगाव येथील सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बी. के. हरिप्रसाद म्हणाले की, मनोरंजनने आपल्या कृत्याने देशाचे मनोरंजन केले आहे. मनोरंजन विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना देव मानतो. पण, खोटे धर्मांध कसे असतात हे काल त्याने सिद्ध केले. त्यांनी देशाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे.
१३ डिसेंबर रोजी हा संसदेचे संरक्षण करणाऱ्या सैनिक आणि पोलीसांचे स्मरण करण्याचा दिवस. आम्ही स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आम्ही असा गोंधळ घालणाऱ्यांना लोकसभेत प्रवेशासाठी पास देतो असे सांगत त्यांनी भाजप खासदार प्रतापसिंहा यांच्यावर निशाणा साधला. कर्नाटक पोलिसांनी मनोरंजनाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.


Recent Comments