Uncategorized

महाराष्ट्र बसची दुचाकीला धडक : दुचाकीवरील मुलीचा मृत्यू

Share

विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा शहरात महाराष्ट्र परिवहन बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील मुलीचा जागीच मृत्यू झाला तर मुलीचे वडील किरकोळ जखमी झाले.

सविता पुजारी असे मृत मुलीचे नाव असून मुलीचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील वदरट्टी गावातील मुलगी वडिलांसह विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील अरकेरी अमोघ सिद्धेश्वर मंदिरात जात असताना हा अपघात झाला. महाराष्ट्र परिवहन मंडळाची क्रमांक एमएच १३ – सीयू ६३३८ बस , आणि बसचालकाला तिकोटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी तिकोटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: