हुबळी विमानतळाला संगोळ्ळी रायण्णा आणि बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आज विधानसभा सभागृहात मांडण्यात आला.
या विषयावर बोलताना नवलगुंदचे आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी सभागृहात हुबळी विमानतळाला संगोळ्ळी रायण्णा आणि कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव बेळगाव विमानतळाला द्यावे, असा प्रस्ताव मांडला.
धारवाड शहराचे आमदार अरविंद बेल्लद म्हणाले की, बेंगळुरू विमानतळाला केम्पेगौडा यांचे नाव देण्यात यावे, अथवा आमच्या प्रादेशिक नेत्याचे नाव द्यावे, हुबळी विमानतळाला संगोळ्ळी रायण्णा यांचे नाव द्यावे आणि बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव द्यावे.
आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कायदा मंत्री एच. के. पाटील म्हणाले की, आ. श्रीनिवास माने आणि आ. अरविंद बेल्लद यांनी विमानतळांचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या विषयावर सर्वांचे एकमत झाले तर सर्वानुमते तो प्रस्ताव मंजूर करू, असे त्यांनी सांगितले.
उद्या विरोधी पक्ष सभागृहात हा प्रस्ताव मांडणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. अखेर अध्यक्ष यू. टी. खादर यांनी हा प्रस्ताव उद्या सादर करणार असल्याचे सांगितले.


Recent Comments