शासनाने अतिथी व्याख्यात्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी अतिथी व्याख्यात्यांचा संप सुरु आहे . यामुळे वर्गच सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे चिक्कोडीत शासकीय पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले


शहरातील बसस्थानक ते मिनीविधान सौधपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली.बहुतेक शासकीय पदवी महाविद्यालयांमध्ये अतिथी व्याख्याते कार्यरत आहेत. सेवेत कायम कारण्यासहीत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते २३ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत.त्यामुळे महाविद्यालयांमध्ये वर्ग होत नाहीत.त्यामुळे शासकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे आमच्या आयुष्याच्या भवितव्यावर परिणाम होत आहे.अशा प्रकारे अतिथी व्याख्यात्यांच्या मागण्या शासनाने तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी समीना सय्यद, बशीर सनदी, सौंदर्य वगे, अभिषेक मसरगोप्पी, प्रज्वल एंदत्तीनावर , पूजा कांबळे , आस्मा सनदी, प्रदीपा मादार आदी उपस्थित होते.


Recent Comments