Belagavi

काँग्रेस आमदारांनी 2D आरक्षणाची प्रत जाळली , यामुळे आम्ही दुखावलो गेलोय

Share

बेळगाव शहरातील वीरराणी चन्नम्मा सर्कलमध्ये पंचमसाली समाजाला मिळालेल्या 2D आरक्षणाची प्रत जाळल्याने , आपण दुखावल्याचे सांगत विजयपूरचे आमदार बसनागौडा पाटील यत्नाळ यांनी काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी आणि विजयानंद कशप्पनावर यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.

बेळगाव येथील गांधी भवन येथे पत्रकारांशी आ.बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी संवाद साधला. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले कि , पंचमसाली समाजाचे सदस्य आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढा देत आहेत आहेत. महाराष्ट्रातील मराठ्यांनी त्यांच्या हक्कासाठी तिथल्या आमदारांना बाहेर काढले. कर्नाटकातही लिंगायत समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

वीरशैव लिंगायत व पंचमसाली व त्यांच्या पोटजातींना आरक्षण द्यावे. मी स्वामीजींना सांगेन की, आतापासून कोणी राजकीय नेत्यांना व्यासपीठावर बोलावू नये. वीरराणी चन्नम्मा सर्कलमध्ये पंचमसाली समाजाला मिळालेल्या 2D आरक्षणाची प्रत जाळल्याचा निषेध व्यक्त करून , करून आमदार बसनागौडा पाटील यत्नाळ यांनी काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी आणि विजयानंद कशप्पनावर यांच्यावर संताप व्यक्त केला.

पंचमसाली समाज सर्व त्यागासाठी तयार आहे या आमदार विजयानंद काशप्पनावर यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना आ. यत्नाळ म्हणाले कि , ते सर्व त्यागासाठी, प्राणत्याग करण्यासाठी तयार असल्याचे सांगत मोठे भाषण करतात. ते म्हणाले की, ज्याला जीवाची गरज आहे, त्याला आरक्षण हवे आहे.

आमचे सरकार असताना आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेर आरक्षणासाठी लढलो. आम्ही येडियुरप्पा, बोम्मई यांच्या विरोधातही बोललो. लढ्याचा परिणाम म्हणून त्या दिवशी आपल्या समाजालाही 2D आरक्षण मिळाले. आता आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोघे न्यायालयात गेले आहेत. ते म्हणाले की, आता काँग्रेसचे सरकार आहे, आमदार, मंत्री लढतील.

Tags: